छोट्या खेळीत त्याने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर.....
धरमशाला, ता. 22 : आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंविरुद्धच्या लढतीत भारताचा सलामीवीर शुभमन गिलने २७ धावा केल्या. टीम इंडियाच प्रिंस अशी ओळख असलेल्या शुभमनला या सामन्यात मोठी खेळी करता आली नसली तरी छोट्या खेळीत त्याने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला.
२४ वर्षीय शुभमन गिलने आंतरराष्ट्री वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा करण्याचा विक्रम गुरुवारी केला. २०१९ साली वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या गिलने फक्त ३८ डावात २ हजार धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. त्याने ४० डावात ही कामगिरी केली होती.
या लढतीच्या आधी शुभमनच्या नावावर १ हजार ९८६ धावा होत्या. ज्या त्याने फक्त ३७ डावात केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध १४वी धाव घेताच त्याच्या २ हजार धावा पूर्ण झाल्या. विशेष म्हणजे हाशिम अमलाने १२ वर्षापूर्वी भारताविरुद्ध हा विक्रम केला होता. त्याने ४१व्या वनडेत ४०व्या डावात ही कामगिरी केली. अमला हा भारतीय वंशाचा द.आफ्रिकाचे क्रिकेटपटू असून त्याने १८१ वनडेत ८ हजार ११३ धावा केल्या आहेत. अमलाच्या नावावर २७ शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.
शुभमन गिलने ३८ वनडेत ६ शतकांसह ही कामगिरी केली आहे. त्याने १० अर्धशतक केली आहेत. गिलची सरासरी ६४ इतकी असून स्ट्राइर रेट १०२ इतका आहे. गिलकडे भारताचा पुढचा सुपरस्टार म्हटले जात आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीकरत भारताला २७४ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने १२७ चेंडूत १३० धावांची शतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या