Type Here to Get Search Results !

आता थांबायच नाय, लढायचंच......

 

आता थांबायच नाय लढायचंच..


बेळगाव, ता. 2 ः रिंगरोडसाठी प्रशासनाकडून जमिन संपादन करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्चीया लढाई बरोबर  न्यायालयीन  लढाई चालु ठेवली आहे. याचे यश मिळालेले आहे. अजूनही न्यायालय लढण्याची गरज असून आता थांबायचं नाही, लढायचंच ! मात्र, यासाठी शेतकऱ्यांची एकी अत्यंत्य महत्वाची असणार आहे. असे मार्गदर्शन सोमवारी (ता.2) झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत उपस्थित वकिलांनी केले. 




बेळगाव शहराच्या सभोवताली रिंगरोड निर्माण करण्यासाठी जवळपास 1200 एकर शेत जमिन संपादन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. याविरोधात गेल्या आठवड्यात बेळगाव तालुक्यातील शेतकरी उच्चनायालयात धाव घेतली. परिणामी न्यायालयाने या रस्त्यासाठी जमिन संपादनावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे रिंगरोडला पुन्हा ब्रेक लागला आहे. या लढ्याची पुढील माहिती आणि चर्चा करण्यासाठी  शेतकऱ्यांची बैठक समितीच्या कार्यालयात  पार पडली. यावेळी आमदार मनोहर किणेकर, वकिल एम. जी. पाटील, विकल शाम पाटील, वकिल सुधिर चव्हाण, वकिल सडेकर यांनी मार्गदर्शन केले. 


या रिंगरोडच्या विरोधात आपण तब्बल सहा वर्षे लढत आलो आहे.  उच्च न्यायालयाने या रिंगरोडच्या प्रस्तावाला स्थगिती दिली असून हे सर्वात मोठे यश आहे. रिंगरोड निर्माण झाल्यानंतर आपला अल्प भुधारक शेतकरी संकटात संपडणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी यापुढी एकीच्या बळावर आपल्यावर होणाऱ्या अण्यायाच्या विरोधात लढण्याची गरज आहे.  असे प्रतिपादन वकिल सुधिर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वकिल राजाभाऊ पाटील, शंकर चौगुले, महेश पाऊसकर, शट्टूप्पा पाटील, जक्काप्पा शहापूरकर, वसंत मन्नोळकर आदीसह आंबेवाडी, वाघवडे, कडोली, उचगाव, बेळगुंदी, कल्लेहोळ अन्य गावातील शेतकरी उपस्थित होते. 
----------------------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या