"सुवर्णलक्ष्मी" तर्फे जेष्ठांचा चा सत्कार
बेळगाव, ता. 14 : " दैवज्ञ ब्राह्मण समाजाला समृद्ध संस्कृती, भव्य इतिहास आणि दिव्य परंपरा लाभलेली आहे. या समाजातील दोन ज्येष्ठांनी आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करीत असतानाच समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे" असे विचार डॉ विनोद गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील सुवर्णलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री विठ्ठल उर्फ गुंडू शिरोडकर आणि व्हाईस चेअरमन विजय सांबरेकर यांनी अलीकडेच वयाची 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुवर्ण लक्ष्मी सोसायटीचे संस्थापक व विद्यमान संचालक मोहन कारेकर हे होते.
जायन्ट्स भवनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मोहन कारेकर यांनी केले. त्यानंतर सोसायटीच्या संचालकांच्या वतीने, कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि उपस्थित अनेक मान्यवरांच्या वतीने उभयतांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू अर्पण करून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे व्यवस्थापक अभय हळदणकर, अकाउंटंट प्रदीप किल्लेकर, संचालक दीपक शिरोडकर, जायन्ट्स सेक्रेटरी लक्ष्मण शिंदे, मदन बामणे, पी आर कदम व अनंत लाड यांची सत्कारमूर्तींच्या जीवनाचा आढावा घेणारी व त्यांना दीर्घायुष्य चिंतिणारी भाषणे झाली. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल उभयतांचा मुक्त कंठाने गौरव करण्यात आला. आपल्या सत्काराबद्दल दोघाही सत्कारमूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. "या सत्कारामुळे आपल्याला नवी ऊर्जा प्राप्त झाली असून आपण शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहोत" असे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या विनोद गायकवाड सरांनी उभयतांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून त्यांचे कौतुक केले." ज्यांची मानसिक स्वास्थ्य उत्तम, त्यांचे व्यक्तिमत्व भक्कम "असे ते म्हणाले. सुजाता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास सुवर्ण लक्ष्मी सोसायटीचे सर्व संचालक कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांचे विद्यमान अध्यक्ष सुनील मुतगेकर आणि इतर सभासद ही उपस्थित होते.
------------------------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या