Type Here to Get Search Results !

कारखाने चालवायचे की....


कारखाने चालवायचे की...
 
बेळगाव, ता. 13 ः ग्रामीण भागात सध्या विजेच्या लंपडाव सुरू असून या लंपडावाला ग्रामीण भागातील उद्योजकांना अधिक त्रासदायक ठरला आहे. अचानक कोणत्याही सुचना न देता विजपुरवठा खंडित केल्यामुळे उद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. विज नसल्यामुळे तासंतास कामगारांनाही बसुन रहावे लागत आहे. उद्योग सुरू करावा की बंद ठेवावे. अशी परिस्थिती निर्माण झाली असून सुरळीत विज पुरवठा करावा. अन्याथा तीव्र आंदोलन करू, या मागणीचे निवेदन काजू प्रक्रिया उद्योग असोसिएशन व ग्राम पंचायतीच्या वतीने शुक्रवारी (ता.13) 
 हेस्काॅमच्या अधिकाऱ्यांना दिले.  

यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष प्रताप सुतार म्हणाले, गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून बेळगुंदी भागातील वीज पुरवठा खंडित होत आहे. बेळगुंदी भागात काजू प्रक्रिया उद्योग अधिक असून या कारखान्यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. पण, सातत्याने विज पुरवठा खंडित होत असल्याने कारखानदार आणि कामगारांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सध्या पाऊस कमी नसल्यामुळे पिकांनाही पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, विजपुरवठा खंडित केत्यामुळे शेतीलाही पाणी पुरवठा करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. विज पुरवठा खंडित करण्यापुरवी वेळापत्रक जाहीर करने गरजेचे आहे. सध्या सण जवळ येत असून सुरळीत वीज पुरवठ्याची नितांत गरज आहे. तरी अधिकाऱ्यांनी सुरळीत विज पुरवठा करावा. यावेळी चेतन पाटील, बेळगुंदी विभाग काजू प्रक्रिया उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद बोकडे, उद्योजक सुरज बेटगेरीकर, राजू पाटील, महेश पाटील, गजानन पाटील, मारूती पाटील, महेंद्र पाटील, हेमंत पाटील, किशोर पाटील, रघुनाथ गावडा, पवन जाधव आदी उपस्थित होते. 


उचगाव विभागीय कार्यालयातील अधिकारी अनिल पाटील यांनी निवेदन स्विकारल्यानंतर म्हणाले, सध्या विजेचा तुटवडा अधिक असून सुरळीत विज पुरवठा करण्यासाठी नियोजन सुरू आहे. या बाबत हुबळी येथे उच्च अधिकाऱ्यांची बैठक आज असून याबाबत चर्चा होणार आहे. यावर तातडीने तोडगा काढून सुरळीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. असे आश्वासन दिले. 
--------------------------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या