" बिजगर्णी " तील पथदीप पंधरा दिवसापून बंद
ग्राम पंचायतीकडून दुर्लक्ष ; नागरीकातून नाराजी
बेळगाव, ता. २ ः बिजगर्णी गावातील पथदीप बंद असून गावकऱ्यांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. या बाबत गावातील लोकांनी ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारही केली आहे. यासह ग्राम पंचायतीच्या प्रतिनिधींकडेही करण्यात केली गेली आहे. पण, लोकांच्या या तक्रारीकडे ग्राम पंचायतीकडून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी गावातील लोकांतून तीव्र नाराजी व्य़क्त करण्यात येत आहे.
बिजगर्णी गावात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पथदीप बंद अवस्थेत असून गावातील नागरीकाना अधंराचा सामना करावा लागत आहे. ग्राम पंचायतीकडून वीज बीलाची रक्कम भरणा केली गेली नाही काय भरणा करण्गायात आली नाही का? अशी चर्चा लोकातून केली जात आहे. गणेशोत्सवच्या काळातही गावातील पथदीप बंद ठेवण्मयात आले होते. याबाबत काही लोकांनी ग्राम पंचायीतच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात केली गेली. सध्या गेणोशोत्सव सुरू असून निदान या काळात तरी गावातील पंथदीप रात्रीच्यावेळी सुरू ठेवावेत. जेणेकरून लोकांना त्रास होणार नाहीत. मात्र, या तक्रारीकडे ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. गणेशोत्सव संपून तीन दिवस पूर्ण झाले. तरी आजही गावातील रस्त्यांवर अंधार पसरलेला आहे. त्यामुळे लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
-------------------------------
प्रतिक्राया
गावातील पथदीप सातत्याने नादुरूस्त होत असून याबाबत ग्राम पंचायतीच्या लाईनमनला सुचना दिल्या गेल्या होत्या. त्यांनी प्रमाणे पाहणी ही केली असून एकाचवेळी पथदीप गेल्यामुळे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील दोन दिवसात सुरळीत पथदीप सुरू केले जाणार असून याबाबत संबंधित कर्मचाऱ्य़ाला सुचना दिल्या गेल्या आहेत.
मनोहर बेळगावकर
अध्यक्ष, ग्राम पंचायत. बिजगर्णी
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या