Type Here to Get Search Results !

18 नोव्हेंबर रोजी बाल साहित्य संमेलन

23 बाल साहित्य संमेलन 18 नोव्हेंबर रोजची


 बेळगाव, ता. 15 : गुरुवर्य वि.गो .साठे  मराठी प्रबोधिनीच्या वतीने 23 वे बाल मराठी साहित्य संमेलन 18 नोव्हेंबर रोजी भरविण्याचा निर्णय प्रबोधिनीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयंत नार्वेकर होते.



 बैठक मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात पार पडली. बैठकीमध्ये 23 व्या मराठी बालसाहित्य संमेलन भरविण्याबरोबर इतर विषयावर  चर्चा करण्यात आली.   प्रथमतः प्रबोधनीचे अध्यक्ष श्री जयंत नार्वेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.   बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत निषेधाचा ठराव मांडण्यात आला.

 गुरुवर्य वि.गो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बाल साहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी 23 वे मराठी बालसाहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून भाऊराव काकतकर महाविद्यालय चे मराठी विभागाचे प्राध्यापक व लेखक डॉ.डी .टी.पाटील यांची निवड करण्यात आली व उद्घाटक म्हणून बेळगाव मधील व सध्या मुंबई येथे स्थायिक  असलेले श्री सुरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली . या साहित्य संमेलनामध्ये कथाकथन ,कवी संमेलन व बालगीतांची संगीत मैफील अशा विविध सत्रांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कथाकथन स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलनासाठी स्वरचित कविताही विद्यार्थ्यांनी  पाठवायच्या आहेत. या संदर्भातले निवेदन लवकरच सीमा भागातील शाळांना पाठवले जाईल. प्रबोधिनीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने हे साहित्य संमेलन उत्साहाने पार पडण्यासाठी नियोजन करण्यात आले.  

 बैठकीला उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील ,, चिटणीस श्री सुभाष ओऊळकर, मालोजी अष्टेकर ,सुरेश गडकरी , प्रा. सुभाष सुठंणकर, विजय बोंगाळे, नीला आपटे, इंद्रजीत मोरे, नारायण उडकेकर, गजानन सावंत, प्रसाद सावंत हर्षदा सुंठणकर उपस्थित होते. आभार धीरजसिंह राजपूत यांनी मानले.

---–----------------------





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या