स्वराज्याचे सुराज्य करण्याची गरज : श्री. चौगुले
बेळगाव, ता. ९ : गणेशोत्सव स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा लोकोत्सव स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या प्रयत्नांना पूरक कसा ठरू शकेल, याचा विचार आता करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आर एम चौगुले यांनी कलमेश्वर नगर हिंडलगा येथील विघ्नहर्त्या युवक मंडळाच्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवताना केले.
या वेळी हिंदलागा ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा चेतना अगसगेकर यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी श्री. चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्री गणेशोत्सवास सुरवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष धाकलु केदार ,राजू ल्हामजी, नारायण पाटील, भरत जाधव, मारुती गुंडप, नामदेव बेळगावकर, अविनाश नाईक आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाने येत्या भविष्य काळात अनेक विधायक कामे करावीत अशी आशा व्यक्त करून श्री. चौगुले यांनी शुभेच्या दिल्या. भरत जाधव यांनी आभार मानले
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या