Type Here to Get Search Results !

सफाई कर्मचाऱ्यांकडून पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

हातउसने म्हणून घेतलेले पैसे व्याजसहित थकबाकी भरले नाहीत. त्यामुळे संबंधित कंत्राटदारकडुन थकीत रक्कम भरण्यासाठी सातत्याने फोन येत असल्याने, या त्रासाला कंटाळून एका सफाई कामगाराने आपल्या राहत्या घरी गळपास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.1) उघडकीस आला.







शशिकांत शुभाष घाभोले (वय २८ )राहणार ज्योती नगर गणेशपूर असे मृत कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सदर घटना उघटकीस आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत हा महापालिकेचा कंत्राटदार सफाई कर्मचारी होता. त्याने काही वर्षापूर्वी आपल्या कंत्राटदार कडून काही हात उसने कर्ज थकविले होते. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कडून कर्ज वसुलीसाठी त्याला सतत फोन करीत होता. या जाचाला कंटाळून शशिकांतने आत्महत्या केली. असा आरोप मयत कुटुंबियांनी केला आहे.   त्यामुळे त्या संबंधित कंत्राटदारवर कारवाई करा. त्याचबरोबर घाभोले गरीब कुटुंबियाना आर्थिक मदत करा. अशी मागणी  करत महापालिका कर्मचाऱ्यांनी कॅम्प पोलीस ठाण्यासमोर घेरावं घातला. शुक्रवारी दिवसभर कुटुंबीय व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्या कंत्राटदारने तीन लाख रुपये देऊ कुटुंबीयांना दिले आहे. पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
 ......................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या