संस्कृती टिकली तरच धर्म टिकणार
धनंजय जाधव ; बेळगुंदीत भाजपकडून महाआरती
बेळगुंदी, ता. २७ ः एक गाव एक गणपती ही संकल्पना अंत्यत गरजेची असून गेल्या 96 वर्षापासून बेळगुंदीचे गावकरी ही संकल्पना अखंडपणे राबवित आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. या संकल्पनेतून आपली एकी ठेवणे गरजेचे असून याबरोबर मंडळाने अन्य सामाजिक उपक्रम हाती घेतले पाहिजे. असे विचार भाजप ग्रामीणचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.
बेळगुंदी येथील सार्वजनिक गणेश मूर्तीसमोर महाआरती भाजपच्या वतीने बुधवारी (ता.२७) करण्यात आली. यावेळी बेळगुंदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान श्री. जाधव यानी विचार मांडले. ते म्हणाले, आपला समाजातील युवक व्यसनाकडे अधिक वळत आहे. या युवकांना योग्य मार्गदर्शन देऊन, व्यसनाधिन होण्यापासून वाचविण्याची गरज आहे. आपली संस्कृती टिकली तरच आपला धर्म टिकणार आहे. मंडळाने अनेक समाजिक उपक्रमाचे आयोजन करून युवा पिढीला वाईट मार्गापासून वाचविण्याची गरज आहे.
महाआरती नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रा. पं. अध्यक्ष प्रताप सुतार, ग्रा. पं. माजी अध्यक्षा हेमा हादगल, सदस्य यल्लाप्पा ढेकोळकर, प्रसाद बोकडे, सुर्यकांत चौगुले, देवाप्पा शिंदे, संतोष बेळगावकर, अनिक कंग्राळकर, परशराम शिंदे, रवळनाथ बागिलगेकर आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते. मंडळाकडून उपस्थित मान्यवरांचा शाल व ग्रामीणच्या राज्याची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील अन्य संघटनानी प्रसादाचे वितरण केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व गणेश भक्त उपस्थित होते.
-------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या