ग्रामीण मतदारसंघात भाजपाची ताकद वाढतेय
बेळगाव, ता. 26 ः बेळगाव ग्रामीण मतदार संघात काॅग्रेसची सत्ता असली तरी गेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकामध्ये भाजपाने अनेक ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व मिळविले आहे. परिणामी ग्रामिण मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. याचा फायदा भाजपाला लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकण समितीला अधिक मते मिळाली होती. मात्र, यावेळी लोकसभा निवडणुकीत ग्रामिण मतदारसंघातून सर्वाधिक मते घेण्याचा चंग भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मानला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुक मोठी चुरशीची ठरणार असून म. ए. समिती कोणता निर्णय घेणार हे अधिक महत्वाचे ठरणार आहे.
बेळगाव मतदार संघात काॅंग्रेसची ताकद अधिक आहे. अनेक गावांमध्ये मंत्री हेब्बाळकर यांनी स्वतः संपर्क ठेवला आहे. आजही महिलांच्या मनामध्ये लक्षी हेब्बाळकर महिलांचे नाव आहे. ज्याज्यावेळी काॅंग्रेसकडून कोणताही कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. त्या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी झाली आहे. एकूणच आजही मंत्री हेब्बाळकर यांना महिलांतून पाठिंबा वाढलेला दिसून येत आहे. राज्यातही काॅंग्रेसला मतदारांनी बहुमत दिले आहे. विकासाच्या मुद्द्यावरून लोकांना काॅंग्रेसच्या पाठिमागे जाण्याचा निर्णय घेतलेल्या दिसून आला. पण, गेल्या दीड महिन्यापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीच्या पुढील अडिच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या. गेल्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेसने बहुतांश ग्राम पंचायतीवर आपली सत्ता काबिज करून मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवले होते. पण, यावेळी भाजपाने बहुतांश ग्रामपंचायतीवर कमळ फुलवत काॅंग्रेसची सत्ता असलेल्या ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व संपादन केले आहे. परिणामी तालुक्यात भाजपचे वारे अधिक वाहू लागले असून युवा वर्गाचाही पाठिंबा वाढत आहे.
ग्रामीण मतदार संघात भाजपचे वर्चस्व वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणूका जवळ येत असल्यामुळे याचा फायदा कसा घेता येईल. यासाठी भाजपाकडून आतापासून मोर्चेबांधनी केली जात आहे. राज्यात आणि ग्रामीण मतदार संघातही काॅंग्रेसची सत्ता असली, तरी काॅंग्रेसच्या गाव पातळीवरील नोत्यांध्ये काडीमोड झाले आहे. याचा परिणाम पक्षावर झालेला दिसून येत आहे. ग्रामीण मतदारसंघाच्या पश्चिम भागात अशाप्रकारचे राजकरण अधिक घडले आहे. याचा परिणाम तालुक्याच्या राजकरणावर पडण्याची शक्यता आहे. एकूणच यामधिल नाराज प्रमुख कार्यकरत्यांनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाची वाट पकडली आहे. सध्या उघडपणे नसले तरी पडद्याडून भाजपला पाठिंबा देण्याचे काम काॅंग्रेसच्या नाराज गटाने सुरू केले आहे. परिणामी ग्रामिण मतदार संघात भाजपाची ताकद वाढत आहे. एकूणच बेळगाव लोकसभा मतदारसंघातील निवडणुक मोठ्या चुरशीची होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या