समितीकडून ग्रामीच्या राजाकडे साकडे
बेळगुंदीत महाआरती, नेत्याची उपस्थिती
बेळगुंदी, ता. २५ : एक गाव एक गणपती या संकल्प राबविण्यातजिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या बेळगुंदीच्या ग्रामीणच्यागणरायाची महाआरती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी (ता.२५) करण्यातली. महाआरती झाल्यानंतर समितीच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान हे गणराया सध्या बेळगाव तालुक्यावर असलेले दुष्काळाचे संकट दूर कर आणि शेतकऱ्यांना आनंदीत ठेव असे साकडे समितीच्या वतीने गणरायकडे घालण्यात आले.
गणरायाच्या आरती दरम्यान समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, आंबेवाडी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष चेतन पाटील, मारुती शिंदे, किरण मोटणकर, प्रसाद बोकडे, बेळगुंदी ग्राम पंचायतीचे सदस्य राजू किणयेकर, बेळगुंदी तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष परशराम आमरोळकर, विलास हुबळीकर, प्रल्हाद शिंदे, पुंडलिक सुतार, किशोर पाटील, रवळू शहापुरकर, चाळोबा बेटगेरीकर, महादेव पाऊसकर, दशरथ पाऊसकर आदीह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून उपस्थितांचे ग्रामीणच्या राजाची प्रतिमा आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
---------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या