खानापूर तालुक्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. मराठी शाळा बंद करण्याचा घाट कर्नाटक सरकारकडून घातला जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा कार्य तातडीने थांबवा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली.
खानापूर तालुक्यातील 76 मराठी शाळावर कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याचा घाट सुरू केला आहे. गोरगरीब, वंचित, दुर्गम भागातील लेकरांचे शिक्षण संपुष्टात येण्याची भीती मराठी संघटनाकडून केली जात आहे. समितीचे नेते अंकुश केसरकार म्हणाले , त्या मराठी शाळांमध्ये दुर्गम भागातील अत्यंत गरीब असलेल्या शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी कोणत्या श्रीमंतांच्या घराण्यातील मुलं शिक्षण घेत नाहीत. विशेषतः मुली शिक्षणापासून दुरावतील. वस्ती, वाडी, तांड्यावर, दऱ्या-खोऱ्यातील, दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नदी-नाले ओलांडून अनेकदा टेकड्या पार करून शाळेत पोचावे लागते. या शाळेतून हजारो मुले शिक्षण घेतात. तेथे जवळच तशा सुविधा केल्या असताना, खर्चाच्या व पटसंख्याच्या नावाने टाहो फोडत या शाळांची दारे कायमची बंद करणे हे चुकीचे आहे. खानापूर तालुक्यातील बहुतांश शाळा ग्रामीण, दुर्गम भागात आहे. शाळा बंद करू नये.
यावेळी श्रीकांत कदम, सिध्दार्थ चौवुले आदींसह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या