Type Here to Get Search Results !

पिके कोमेजू लागली, शेतकऱ्यांची चिता वाढली


 पावसाळ्यात " मे " प्रमाणे  उन्हाच्या झळा 

गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. जमिनीला भेगा पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिता वाढली आहे. मे महिन्याच ज्या प्रमाणे उन्हाचे चटके लागतात त्याहून अधिक उऩ्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पिरणामी पिके कोमेजू लागली असून संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष मोठ्या पावसाकडे लागून राहिले आहे. वीजेचाही सुरळीत पुरवठा नसल्यामुळे तीही अडचण निर्माण झाली आहे. 



सध्या सर्वच  पिकांना पावसाची नितांत गरज असून या आठदिवसात जोराचा पाऊस झाला नाही. तर यंदा प्रत्येक पिकाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. पंपसेटव्दारे पाणी सोडता आले असते. पण, हेस्काॅमकडून सुरळीत वीज पुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.   

दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरूवात होत असते. मात्र, यंदा जुलै महिना उजाडला तरी पावसाला सुरूवात झाली नाही. उशिरा सुरूवात झाल्यामुळे पेरणी आणि रोप लागवड लांबणीवर पडली. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने शेतीची सर्वच कामे रेंगाळली. पुन्हा पावसाने दडी मारल्याने  पिके कोमेजू लागली आहेत.


 तब्बल  दीड महिना पाऊस थांबला आहे. उन्हाळ्यामध्ये ज्याप्रमाणे उन्हाचे चटके बसतात. त्याप्रमाणे गेल्या महिन्यातही उन्हाच्या झळा सहन कराव्या लाग आहे. पाऊस थांबल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बत चालला आहे.  पावसाभावी बाजरी, मक्का यासह अन्य चाऱ्याच्या पिकांची वाढ थांबली आहे. रताळी लागवड झाली झाली असून पिक उत्तम सजले आहे. मात्र, पावसाने पूर्णता विश्रांती घेतल्यांने वाढ थांबली आहे. भुईमूगचीही अशीच अवस्था झाली आहे. नाचना पिकाची रोप लागवड चांगली झाली आहे. पण, पाऊस थांबल्याने पिवळा होऊ लागला आहे.

शिवारातील पाणी अटल्यामुळे जमिनीला भेगा पडलेल्य दिसून येत आहेत. शेतकरी बांधव गावातील नाल्यांवर बांध घालून शिवारात पाणी वळविले आहे. पण, पाऊस अधिक दिवस गेल्यांने नाल्यांच्या पाण्याच्या पातळीतही कमालीची घट झालेली आहे. पिकांना जिवदान मिळण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असून याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 
----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या