Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी निर्दोष मुक्तता


बेळगाव, ता. १ : मराठी भाषिकांवर दडपशाही करत २०१४ मध्ये येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य फलक हटवल्याच्या विरोधात उचगावमध्ये महाराष्ट्र राज्य फलक उभारल्याप्रकरणी दाखल याचिकेवर मंगळवार (ता.१ ) झालेल्या सुनावणीत संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.



येळ्ळूरमधील सुप्रसिद्ध महाराष्ट्र राज्य फलक हटवल्याच्या रागातून सीमाभागातील काही गावांत महाराष्ट्र राज्य फलक उभारण्यात आले होते. उचगावमध्येही असे फलक उभारण्यात आले होते. त्यामुळे, भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत काकती पोलिसांनी उचगावमधील मनोहर होनगेकर, भास्कर कदम, संतोष पाटील, विवेक गिरी, राजेंद्र देसाई, अरुण जाधव, नितीन जाधव, अनंत देसाई आणि गणपत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

 आतापर्यंत सुनावणीवेळी सर्व संशयित उपस्थित होते. याचिकेतील साक्षी, पुरावे तपासण्यात आले. आज (ता.१)  संशयित आरोपींची निर्दोष मुक्ताता करण्याचा निकाल बेळगाव जिल्हा न्यायालयाने दिला आहे. उचगावमधील कार्यकर्त्यांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे  यांनी काम पाहिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या