Type Here to Get Search Results !

रेल्वे मार्गासाठी 335 हेक्टर जमिन भूसंपादन

  73 कि.मि. मार्गासाठी 927 कोटी होणार खर्च 


बेळगाव ते धारवाड या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात केली जाणार असून त्यासाठी रेल्वे विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या सुपिक जमिनीतून रेल्वे मार्ग करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्याला शेतकऱ्यांकडून विरोध कायम आहे. सुपिक ऐवजी पडिग जमिनीतून रस्ता निर्मित करावा. अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. 


नैऋत्य रेल्वे विभागाकडून गेल्या सात के आठ महिन्यापासून या रेल्वे मार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली जा आहे. या मार्गासाठी सुमारे 335 हेक्टर जमिनींचे ंसंपादन केली जाणार असून या रस्त्यासाठी रेल्वे विभागाकडून 927 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. 



या रेल्वे मार्गासाठी देसूर, नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, के. के. कोप, यासह अन्या गावातील पिकाऊ शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी पडिग जमिनीतून मार्ग करावा. अशी मागणी होत आहे. बेळगाव-धारवाड या नियोजित रेल्वे मार्ग 73 किलोमिटर इतक्या लांबीचा असणार आहे. यामार्गावर एकूण सात ठिकाणी रेल्वे थांबे आहेत. त्याचबरोबर या मार्गावर 140 छोटे मोठे पूल उभारण्याची गरज असणार आहे. 
-----------------------------------  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या