युवा समितीकडून बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव, ता. १९ : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा कॅम्प येथे युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत बिर्जे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
युवा समिती सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती देत म्हणाले, २०१८ पासून हा उपक्रम सुरू असून आज जवळपास २०० शाळा आणि ७००० विद्यार्थ्यांपर्यंत हे शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यात येते आहे. कॅन्टोन्मेंट शाळेची पटसंख्या २०१६-१७ साली १२० पटसंख्या होती आज त्यात उल्लेखनीय वाढ झाली असून जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेचे व शिक्षक वर्गाचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व व मराठी शाळा का टिकल्या पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक करत सदर उपक्रमामुळे मराठी शाळांमधील पटसंख्या वाढ झाली असून शाळांमध्ये अजून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे असे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी युवा समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, पदाधिकारी दत्ता पाटील, संतोष कृष्णाचे, शिक्षक धनाजी कुरणे, नीता गुंजीकर, श्रीकांत कातकर, मनीषा वटगोळ, तुषार कांबळे, राहुल कांबळे आदी उपस्थित होते, सहशिक्षक श्री उदय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या