Type Here to Get Search Results !

समितीकडून ऍड. चव्हाण यांचा सत्कार



बेळगाव, ता. १ : तब्बल  तीन दशकानंतर बेळगाव बार. असोसिएशनच्या अध्यक्षपदी मराठी वकील सुधीर चव्हाण यांची निवड झाल्यबद्दल  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या  वतीने शुभम शेळके, सूरज कणबरकर, रवी निर्मळकर यांनी शुभेच्छा दिल्या.



त्याचबरोबर स्नेहालय स्पर्श संस्थेचे संचालक उदय कलघटकर व संचालक धनराज काविलकर यांनी स्नेहालय संस्थेचे कायदा सल्लागार यांची आज बेळगाव बार. असोसीएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे असे म्हणत त्यांना शुभेच्या दिल्या व अभिनंदन केले.

यावेळी- महेश सावी, आश्र्वजीत चौधरी, बलराम परमोजी, मनोहर हुंदरे, नारायण मुचंडी, प्रणीन रेडेकर, विनायक हुलजी, नंदू हिरोजी, दीपक सव्वाशेरी, इमरान मुजावर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या