बेळगाव, ता. १ : बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नुतन अध्यक्ष ऍंड. सुधीर चव्हाण यांचा सकल मराठा समाजाचे नेते आणि विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. चव्हाण यांना त्यांच्या पुढील वाटचालीस उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन ही जिल्ह्यातील प्रमुख संघटना असून या संघटनेच्या अध्यक्षपदी क्रियाशील कार्यकर्ते ऍड. सुधीर चव्हाण यांची निवड ही मराठा समाजाकरिता अभिमानास्पद आहे. तीन दशकानंतर मराठी माणसाला बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद मिळाले आहे. सुधीर चव्हाण यांच्या क्रियाशील आणि सेवाभावी कार्याची ही पोचपावती असून ज्त्यांच्या या निवडीने मराठी माणसाची मान उंचावली आहे, असेही किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी विमल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि मराठा समाजाचे लोक उपस्थितीत होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या