4 कोटी 23 लाख रूपये "जल जीवन"साठी खर्च
बेळगुंदीत खासदार अंगडीच्या हस्ते भूमीपूजन
बेळगुंदी, ता. २८ : गावात 4 कोटी 23 लाख रुपये खर्च करून जल जिवन योजना राबविण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपीजन सोमवारी (ता.२८) खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष प्रताप सुतार होते.
प्रारंभी कुदळ मारून विकास कामांचे भूमी पूजन केले. यानंतर अध्यक्ष श्री. सुतार यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले. गावातील प्रत्येक घराला नळ जोडणी करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्राकडून केवळ बेळगुंदी गावाला 4 कोटी 23 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी ही योजना अधिक फायद्याची आहे. अशी माहिती श्री. सुतार यानी दिली. यावेळी खासदार मंगला अंगडी यांचा सत्कार पंचायत सदस्य हेमा हदगल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सुमन गावडा, कल्लाप्पा ढेकोळकर, दीपा लोहार, बाळकृष्ण लोहार, विनय कदम, देवाप्पा शिंदे, सुर्यकांत चौगुले, विनोद पाटील, कल्लाप्प शिंदे आदीस ग्राम पंचायटीचे अधिकारी आणि गावातील लोक उपस्थित होते.
---------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या