येळ्ळूर, ता. 30 : जागतिक तापमाणात अधिक वाढ होत चालली आहे. याचा परिणाम थेट वातावरणावर पडत असून पाऊस पडण्याचे प्रमाण ही कमी होत चालेले आहे. मानवासह प्राण्याच्याही आरोग्यावर या तापमान वाढीचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने वाढत्या तापमानावर नियंत्रण आण्यासाठी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची अत्यंत नितांत गरज ठरली आहे. असे विचार नवहिंद क्रीडा केंद्राच्या वार्षिक कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांनी मांडले.
रविवारी (ता.30) येळ्ळूर केंद्राचा वार्षिक कार्यक्रम पार पडला. या निमिताने केंद्रच्या वतीने झाडे लावा आणि झाडे जगवा हा उपक्रम हाती घेण्यात आला. दरम्यान लोकांनाही केंद्राच्या वतीने झाडे लावण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी जांभूळ, कडुलिंब, सागवान, चिक्कू आणि चाफा अशा फळे, फुले आणि वन औषधी रोपांची लागवड करण्यात आली. शेतकरी आणि गावकऱ्यांना सदर रोपांचे केंद्राच्या वतीने वितरण ही करण्यात आले.
यावेळी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष, सेक्रेटरी, नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आणि संचालक मंडळ, नवहिंद मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन आणि संचालक मंडळ आणि केंद्राचे सवर्का कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या