बेळगाव, ता. २६ : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार एस. एल. चौगुले यांची समितीतून हकालपट्टी करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते पास करण्यात आला.
मराठा मंदिर येथे शुक्रवारी झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा ठराव पास करण्यात आला. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबाबत आणि पुढील रचना तालुका महाराष्ट्र केंद्र समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पराभवाबाबत मते व्यक्त केली दरम्यान निवडणुकीमध्ये असेल एस. एल. चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरोजिनी चौगुले आणि अशोक ब. चौगुले (मन्नूर) यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप करत प्रचार केलेले फोटो पुरावे म्हणून सादर केले. परिणामी याबाबत बैठकीत चर्चा करून चौगुले यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतुन हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला या ठरावाला सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात पास करण्यात आला.
-----------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या