Type Here to Get Search Results !

कूकर, मिक्सरची होळी

 बेनकनहळ्ळी, ता. ८ : येथे शड्डू ठोकून मराठ्यांना चिथावणी दिल्यामुळे मराठ्यांनी कुक्कर आणि मिक्सरची होळी करून काँग्रेसच्या उमेदवार यांचा जाहीर निषेध नोंदविला. 

काँग्रेसच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महाराष्ट्रातील नेते अशोक चव्हाण, सतेज पाटील हे नेते उपस्थित होते. या नेत्यांना विरोध दर्शविण्यासाठी म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी महाराजांना अभिवादन करून झाल्यानंतर   समितीच्या कार्यकर्त्यांकडे  पाहून आमदाराच्या कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकून मराठा तरुणांना चितवले. परिणामी येथील महिलातूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर गावातील सर्व मराठा समाजातील तरुण आक्रमक झाले असून निषेध व्यक्त केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून  आज कूकर आणि मिक्सर यांची होळी करून काँग्रेसला विरोध दर्शविला. यावेळी अहिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन समितीला संपूर्ण गावचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या