Type Here to Get Search Results !

३० एकर जमीन हडप करण्याचा घाट


३० एकर जमीन हडप करण्याचा घाट

भू माफियांसह अधिकाऱ्यांची मिलीभगत ; शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 बेळगाव, ता. २२ : खोट्या सह्या करून सुमारे ३० एकर शेती जमिन घश्यात घालण्याचा प्रकार भू माफिया केला जात आहे. गावगुंडांना हाताशी धरून जमिनीची मूळ कागदपत्रे असून देखील शेतकऱ्यांना धकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी  याबाबत न्यायालयात धाव घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत. 


बेकिनकेरे गावातील सुमारे २५ शेतकऱ्यांकडे जमिन खरेदी करण्यात आलेली १९६७ पासूनची कागदपत्रके आहेत. मात्र, जमिनीचे मूळ मालकांचे वारसदार शोधून त्या व्यक्तीला पैशाचे अमिष दाखवून शेतकऱ्याच्या ताब्यात असलेल्या जमिनी बळकावण्याचा घाट घातला आहे. यामध्ये सरकारी बाबूंचाही असून भू माफियांना जुनी कागदपत्रके सहजरित्या उपलब्ध करून देत आहेत. वडिलोपार्जित असलेली जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून भू माफिया बाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. 

--------------

तलाठी सूत्रधार 

शेतजमीनीची कागदपत्रके तलाठ्यांच्या हातामध्ये असतात. तेच अधिकारी परस्पर शेतकऱ्यांना फसवत आहेत. भू माफियानी तलाठ्यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी फुकटात लाटण्याचा सपाटा लावला आहे. या भू माफियांना पुढाऱ्यांचाही आशिर्वाद लाभला आहे. त्यामुळे जर जमिनी वाचवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या भू माफियांना वेळीच रोखन्याची गरज आहे. 

-----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या