बोकनूर गावाला दोन दिवसात सुरळीत पाणीपुरवठा
अध्यक्षांसह, अधिकाऱ्यांकडून पाहणी ; बेळगाव वर्तमान इफेक्ट
बेळगाव, ता. १८ : बोकनूर गावाला दोन दिवसात सुरळीत पाणी पुरवठा करू. असे आश्वासन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (१८) दिले. बोकनूर गावात दहा दिवसापासून पाणी टंचाई या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द होताच आज तातडीने ग्राम पंचायत अध्यक्षांसह अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. दरम्यान जल जीवन योजनेतून खोदाई सुरू असलेल्या विहिरीची पाहणी केली.
बोकनूर : काम सुरू असलेल्या विहिरीची पाहणी करताना अध्यक्ष हेमा हदगल, सदस्य शिवाजी पाटील, पीडिओ व अन्य अधिकारी आदी.
बोकनूर (तालुका बेळगाव) गावावर पाणी टंचाईचे संकट कोसले असून गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावातील महिलांना शेतवडीतून डोक्यावर घागरी घेऊन पाणी आणण्याची वेळ निर्माण झाली आहे. गावात गेल्या दहा दिवसापासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत गावातील ग्राम पंचायत सदस्य याकडे कानाडोळा करत असल्यामुळे लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी याबाबत ''बेळगाव वर्तमान'' ने बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे ग्राम पंचयतीला जाग आली आणि आज तातडीने पाहणी केली. दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंते श्री. कोळी यांनी विहिरीची पाहणी केली. तर तातडीने पपंसेट बसून दोन दिवसात सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अध्यक्षा हेमा हदगल, सदस्य शिवाजी पाटील, बालाजी पाटील, पीडिओ अश्विनी मॅडम, सेक्रेटरी आदी उपस्थिती होते.-
------–---------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या