Type Here to Get Search Results !

बोकनूर गावात दहा दिवसापासून पाणी टंचाई

 बोकनूर गावात दहा दिवसापासून पाणी टंचाई

 महिलांना करावी लागते पायपीट ; ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

बेळगाव, ता. १७ : विधानसभा निवडणुकी वरून राजकरण तापलेले असताना.  बोकनूर (तालुका बेळगाव) गावावर पाणी टंचाईचे संकट कोसले असून गावातील महिलांना  पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. परिणामी गावातील लोकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केले असून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.


ग्रामीण भागात सुरळीत पाणी पुरवठा  करण्यासाठी सरकारडून  योजना राबविण्यात आल्या आहेत. पण, या योजना काही गावामध्ये कूच कामी ठरल्या आहेत. बोकनूर गावाला यापूर्वी मुबलक आणि सुरळीत पाणी पुरवठा होत होता. पण गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या गावातील महिलांना पाणी टंचाईचा सामना  करावा लागत आहे. निवडणूका झाल्यापासून या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावाला  निसर्ग झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. मात्र या झऱ्याचे पाणीही कमी झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.  सध्या गावातील लोकांना पायपीट करून शेतवडीतून पाणी आणावे लागत आहे. याकडे ग्राम पंचायतीने  साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावातील लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून  युवा वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. पंचायतीने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. 

---------–---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या