धामणे विभागात रमाकांत कोंडुसकर यांचा झंझावाती प्रचार
बेळगाव, ता. 30 : म. ए. समिती उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी धामणे विभागातील यरमाळ, अवचारहट्टी, देवगणहट्टी, मासगोंडहट्टी, ब्रह्यलिंगहट्टी, धामणे या भागात झंझावाती प्रचार केला.
पदयात्रेला यरमाळ येथून प्रारंभ झाला. यरमाळ येथील युवकांच्या वतीने रमाकांत कोंडूसकर यांचे जोरदार स्वागत केले. घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर अवचारह़ट्टी, देवगणहट्टी, मासगोंडहट्टी, ब्रह्मलिंगहट्टी, काळम्मानगरहून ही प्रचार फेरी रात्री 8 वाजता धामणे येथे पोहचली. या चारी हट्ट्यामधील युवक व महिला आणि वडीलधारी मंडळीची म. ए. समितीचे दक्षिण मतदार संघाचे उमेदवार रमाकांत कोंडूसकर यांचे जल्लोशी स्वागत करुन जय भवानी, जय शिवाजी, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो या घोषनणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
धामणे गावात या प्रचार फेरीचे आगमन होताच आंबेडकर नगर येथे रवी बस्तवाडकर यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने रमाकांत कोंडूसकर यांचे स्वागत केले. त्यानंतर लक्ष्मीनगर, पाटील गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कलमेश्वर गल्ली येथे नवभारत युवक मंडळ, बसवाण गल्ली आदी ठिकाणी फेरी निघाली.
उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी, मराठी माणसांवर आणि सामान्य जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.
महेश बिर्जे, महेश पाटील, यल्लाप्पा रेमाणाचे, बाळू केरवाडकर, मनोहर जायाणाचे, प्रकाश बाळेकुंद्री, बसवंत लोकळुचे, शिवाजी पाटील, दत्ता होनुले, बाळू जायाणाचे, आपाजी कोमाणाचे, सतीश जायाणाचे, श्रीपती पाटील, सोमनाथ मेलगे, महादेव दळवी, बापू पाटील, दशरथ वेलूरकर आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या