व्यापाऱ्यांकडून समिती विजयाचा निर्धार
एपीएमसीत आर. एम. चौगुले प्रचार यांची प्रचार फेरी
बेळगाव, ता. ३० : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीणमधील उमेदवार आर. एम. चौगुले यांनी शनिवारी (दि. 29) एपीएमसीत प्रचार केला. या प्रचारावेळी व्यापार्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी थांबण्याची ग्वाही दिली.
आर. एम. चौगुले यांनी मार्केट यार्ड येथे व्यापारी आणि शेतकरी वर्गाला भेटून मतदान करण्याचे आवाहन केले. सीमाभागात विकास कामे राबवण्यासाठी आणि शेती मालाला योग्य दर मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी चौगुले यांनी दिली.
यावेळी व्यापारी संघटनेने आर. एम. चौगुले यांना पाठींबा दिला. म. ए. समितीने नेहमीच शेतकर्यांच्या हितासाठी लढा दिला आहे. त्यामुळे आम्ही समितीच्या विजयासाठी सर्वतोपरी काम करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बाळाराम पाटील, एन. बी. खांडेकर, यल्लाप्पा चव्हाण, आर. आय. पाटील, एल. एस. होनगेकर, बसवंत मायाण्णाचे, मोहन बेळगुंदकर, अशोक बामणे, संजय चौगुले, माणिक होणगेकर, बाबुराव बामणे, राजू पाटील, संभाजी होनगेकर, राजू काकती, किरण जाधव, सिद्धार्थ नरेगवी, अभिजित मोरबाळे, टी. एस. पाटील, प्रशांत पाटील, प्रविण चांदीलकर, प्रशांत झंगरुचे आदी उपस्थित होते. एपीएमसीनंतर ज्योतीनगर परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या