युवकांचा प्रचार नियोजनात सक्रिय सहभाग महत्वाचा
आर. एम. चौगुले : युवा आघाडी बैठकीत प्रचार नियोजनावर चर्चा
बेळगाव, ता. 28 : सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही कसर न सोडता युवा वर्गाने पूर्ण ताकदीनिशी समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. त्याचबरोबर युवकांचा प्रचार नियोजनात सक्रिय सहभाग महत्वाचा असून
युवकांनी प्रचाराचे नियोजन करावे. असे आवाहन बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे म. ए. समिती उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात युवा आघाडीची महत्वाची बैठक शुक्रवारी अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी उमेदवार चौगुले म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेला सीमा प्रश्नाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत समितीचा उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणताही हलगर्जीपणा करण्यात येऊ नये. युवा वर्गाच्या जोरावरच सीमा लढा सुरू आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही कसर सोडली जाऊ नये, असे आवाहन केले.
अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी, बेळगाव ग्रामीण मतदार संघात मराठी माणूस पेटून उठला आहे. त्यामूळे समितीचा विजय निश्चित आहे. पण आपण गाफील न राहता विजय संपादन करण्यासाठी आक्रमक प्रचार यंत्रणा राबवू, अशी ग्वाही दिली.
यावेळी उपाध्यक्ष दत्ता उघाडे, चिटणीस मनोहर संताजी, विलास देवगेकर, कल्लप्पा पाटील, अंकुश पाटील, बाबाजी देसुरकर, मोहन गरग आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला अनिल हेगडे, महेश जुवेकर,किसन लाळगे, यल्लाप्पा गुरव, सुधीर पाटील, केदारी कणबरकर, नागेंद्र गवंडी, राजू किणयेकर आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या