मंडोळी विभागात समितीची झंझावत प्रचार फेरी ; युवकांचा सहभाग अधिक
मंडोळी, ता. 27 : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मंडळी विभागात समितीची झंजावत प्रचार फेरी बुधवारी (ता.27) पार पडली. दरम्यान मंडोळी विभागातून एक जुटीने महाराष्ट्र एकीकरण चे उमेदवार आर्. एम. चौगुले यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रारंभी हंगरगा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात झाली. गावात महिलांनी निरंजन ओळ उमेदवाराचे स्वागत केले त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात आणि विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला गावातील सर्व महिला वर्ग विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी कृष्णा हुंद्रे दिलीप कांबळे कृष्णा पाटील, गावडू पाटील नारायण पाटील विशाल सावंत अशोक पाटील प्रवीण नावगेकर मंडळी गावातून डी.एल आंबेवडकर केदारी कणबरकर आप्पाजी दळवी, सचिन दळवी, नारायण दळवी आदी सह युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला
------------
युवकांचा सहभाग अधिक.......
मंडोळी येथील मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फेरीला सुरुवात झाली. फटाक्यांचे आतषबाजी, ढोल ताशे अशा जल्लोषी वातावरणात गावातील प्रत्येक गल्लीत मध्ये फेरी काढण्यात आली यावेळी फेरीमध्ये सर्वाधिक युवकांचा सहभाग दिसून आला एक नवचैतन्य निर्माण झाले असून मंडोळी विभागात पुन्हा समितीला बळकटी मिळाली आहे.
-------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या