समितीच्या उमेदवाराला हुतात्म्यांच्या वारसांकडून आर्थिक मदत...
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा झंझावत प्रचार सुरू असून तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
1986 च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या वाररसांडून समितीचे उमेदवार आर.एम. चौगुले याना पाठिंबा दर्शविला असून निवडणुकीसाठी उमेदवाराला आर्थिक मदतही केली आहे. बेळगुंदी येथील हुतात्म्यांचे वारसदार धुळोबा मारुती गावडा, शट्टूप्पा भावकू चव्हाण, जोतिबा कल्लाप्पा उचगावकर यांनी समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले याना रोख रक्कम 20 हजार रुपयांची मदत केली. शुक्रवारी (ता.) सायंकाळी प्रचार फेरी दरम्यान उमेदवार चौगुले यांनी स्मारकाला हारअर्पण करून अभिवादन केले. यावेळी वारसांकडून रक्कम देऊ केली. यावेळी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष शट्टूप्पा चव्हाण, अनुराज गावडा, धुळोबा गावडा, शंकर चौगुले, महेश पाऊसकर, किरण मोटणकर, डॉ. व्ही. एम. सातेरी, चेतन पाटील, राजू किणयेकर, राजू पाटील आदींसह समितीचे कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या