प्रतिनिधी नागेश सुरंगे
प्रशासकीय व मंत्रालयीन कामाचा दांडगा अनुभव असणारे विद्याधर दयासागर महाले यांची, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून नव्या सरकारमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते चिखलीच्या भाजप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे पतीही आहेत.
विद्याधर महाले हे उच्चशिक्षित असून, स्पर्धा परीक्षेतून आधी त्यांची जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्ग २ पदावर नियुक्ती झाली होती. नंतर ते विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त झाले व तेव्हापासून त्यांनी मुंबई व मंत्रालयीन कामात चांगलाच जम बसवला.
विनोद तावडे यांच्याकडे आधी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेत्यांचे त्याचे खाजगी सचिव व नंतर शालेय शिक्षण मंत्राचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. युती सरकारच्या काळात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही ते होते. सत्तापालट झाल्यावर पुन्हा ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे आले, व आता परत भाजपा सत्तेत येताच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खाजगी सचिव म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीने विशेषतः चिखली मतदारसंघासह बुलडाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
Tags:
आपला महाराष्ट्र आपला जिल्हा
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या